एकदा एक कुत्रा आपल्या मालकाच्या घरी, दाराबाहेर झोपला होता. तो बेसावध असतांना एका लांडग्याने त्याला पकडले व आता मारून खाणार एवढ्यात कुत्रा त्याला म्हणाला, 'मित्रा, मी सध्या इतका अशक्त झालो आहे की, मला खाल्ल्याने तुझं पोटही भरणार नाही. त्यापेक्षा तू थोडा वेळ थांब. माझ्या मालकाच्या घरी नुकतेच एक लग्न होणार आहे, तेव्हा मी पुष्कळ खाईन पिईन आणि शक्तीवान होईन, मग तू मला मारून खा.'
लांडगा कबूल झाला व त्याने त्या कुत्र्याला सोडून दिले. नंतर काही दिवसांनी तो कुत्रा दारात बसला असताना लांडगा तेथे आला व म्हणाला, 'मित्रा, कबूल केल्याप्रमाणे तू आता माझ्या स्वाधीन हो.'
तेव्हा कुत्र्याने हसून उत्तर दिले, ' मित्रा, मी जर पुन्हा दरवाज्याबाहेर झोपलेला आढळलो तर तू मला खुशाल मारून खा.
तात्पर्य
- एकदा सुदैवाने एका संकटातून सुटल्यावर पुन्हा त्या संकटात न सापडण्याची खबरदारी घेणे योग्य आहे. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.