एकदा एका कोळ्याने जाळे टाकून मासे पकडण्याचा खूप प्रयत्‍न केला. परंतु त्याला एकही मासा मिळाला नाही. तेव्हा त्याने निराश होऊन आपले सामान गोळा केले व तो घरी जाण्यास निघाला. तोच एक भला मोठा मासा आपोआप उडी मारून त्याच्या टोपलीत येऊन पडला. ते पाहून त्या कोळ्याला खूप आनंद झाला.

तात्पर्य

- पुष्कळ प्रयत्‍नांनी एखादी गोष्ट सिद्धीस जात नाही, पण एखादेवेळी आपोआप घडते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel