एका माणसाच्या पाठीस खाज सुटली, म्हणून त्याने आपल्या हाताने तेथे चाचपून बघितले, तो त्याला एक पिसू सापडली. तेव्हा तो मनुष्य तिला म्हणाला, 'माझं रक्त पिणारी तू कोण?'
पिसूने उत्तर दिले, 'रक्तावरच मी आपला निर्वाह करावा अशी देवानेच योजना केली आहे. शिवाय माझ्य दंशाने मृत्युही येत नाही.' तेव्हा माणूस म्हणाला, 'तुझा दंश भयंकर नसला तरी फार त्रासदायक आहे. तेव्हा तुला ठार मारणंच योग्य.'
तात्पर्य
- हिंसा करू नये. परंतु जे दुसर्यांना निरर्थक त्रास देतात त्यांना ठार मारणेच योग्य. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.