एक भारद्वाज पक्षी एका पारध्याच्या जाळ्यात सांपडला. तेव्हा तो पारध्याला म्हणाला, 'दादा, मी तुझा असा कोणता अपराध केला आहे म्हणून तू मला मारतोस ? मी तुझं काही सोनं चोरलं नाही, फक्त धान्याचे चार दाणे मात्र घेतले, पारध्याने त्याच्याकडे किंचितही लक्ष न देता, त्याची मान मुरगाळली व त्याला आपल्या टोपलीत टाकले !
तात्पर्य
- एकदा शत्रूच्या हाती सापडल्यावर, त्याच्यापाशी आपले निरपराधित्व कितीही सांगितले तरी उपयोग होत नाही. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.