एकदा एक कवडा एका पारध्याच्या जाळ्यात सापडला. तेव्हा तो दीनवाणेपणानं म्हणाला, 'दादा, मला जर तू सोडून देशील तर मी दुसर्या कवड्यांना फसवून तुझ्या जाळ्यात आणीन.'
ते ऐकून पारधी म्हणाला, 'अरे एवढी खटपट करून तुला पकडलंय् ते काय सोडण्यासाठी होय ? अन् स्वतःच्या बचावासाठीच जो आपल्या भाऊबंदांना संकटात टाकतो अशा नीच माणसांवर तर दया दाखवणं अजिबात योग्य नाही. तेव्हा मी तुला सोडणार नाही ! असा घातकीपणा करणार्याला शासन झालंच पाहिजे.
तात्पर्य
- स्वार्थासाठी आपल्याच लोकांचा नाश करण्यास निघणार्या माणसाइतका दुष्ट कोणी नाही. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.