एकदा एका सिंहाने एका गाढवाला सांगितले, 'तू जंगलात जाऊन ओरडत राहा आणि तो आवाज ऐकून जे प्राणी पळत सुटतील त्यांची मी शिकार करतो ! गाढव तयार झाले. ते जंगलात जाऊन जोरजोरात ओरडू लागले व सिंहाने प्राण्यांची शिकार केली. संध्याकाळी त्यांनी काम बंद केले. नंतर गाढवाने सिंहास विचारले, 'मी माझंकाम कसं केलं? ' तेव्हा सिंहाने उत्तर दिले, 'अरे तू खूपच चांगला ओरडलास, तू गाढव आहेस हे जर मला माहीत नसतं तर मीही तुला घाबरलो असतो.'

तात्पर्य

- थोड्याशा कामाबद्दल गर्व करणे हा मूर्खपणा आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel