एक बोकड एका तुटलेल्या कड्यावर चरत उभा होता. तेव्हा एका सिंहाने त्याला पाहिले व तो त्याला म्हणाला, 'अरे, इतक्या उंचावर उभे राहण्यात धोका आहे. त्यापेक्षा मी जिथे उभा आहे तिथे आलास तर तुला छान हिरवंगार गवत खायला मिळेल.'

तेव्हा बोकडाने उत्तर दिले, ' आपल्या सूचनेबद्दल आभारी आहे. पण आपण माझ्या पोटाची काळजी करीत आहात की स्वतःच पोट माझ्या मासाने भरण्याच्या विचारात आहात ते मला चांगलं समजतं.'

तात्पर्य

- शत्रूने कितीही हिताच्या गोष्टी सांगितल्या तरी शहाण्याने त्यावर विश्‍वास ठेवू नये.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel