मग तिने एके दिवशी सूरजला तिचा रोहनसोबतचा संबंध सांगितला, मग रोहनच्या ऍक्सिडेंटबद्दल सांगितले. सूरज शांतपणे ऐकून घेत होता.
रागिणी पुढे म्हणाली, "रोहनच्या मृत्यूनंतर मी डिप्रेशनमध्ये गेले आणि राहुलच्या नादी लागले. अर्थात त्यांचेशी माझे शारीरिक संबंध नव्हते आणि तसे ते रोहनसोबतही नव्हते. राहुल आधीपासून माझ्यावर एकतर्फी प्रेम करत होता आणि मी त्याला नाकारले होते पण रोहनच्या मृत्यूनंतर तो थोडा सुखावला आणि मी आता त्याला हो म्हणेन अशी एक आशा त्याच्या मनात तयार झाली. मी राहुलला भेटायला लागले हे माझ्या घरी माहिती नव्हते. राहुलने मला मानसिक आधार देण्याचे नाटक करून मला हळूहळू सिगारेट, दारूची सवय लावली. मग एकदा मला माझ्या नकळत एका सिगारेट मध्ये ड्रग्ज भरून दिले!"
ड्रग्जचे नाव काढताच सूरजच्या चेहेऱ्यावर एक प्रकारची वेगळीच चिंतायुक्त अस्वस्थता पसरली. ती लपवून तो म्हणाला, "ओह नो रागिणी! खूपच वाईट झालं! आणि हे सगळं तू माझ्यापासून लपवून का ठेवलंस? माझ्यावर विश्वास नव्हता का?"
रागिणी म्हणाली, "तसे नाही रे सूरज! मला भीती होती की मी तुला गमावून बसेल! एकदा रोहनला गमावले होते आणि तुला गमवायचे नव्हते!"
सूरज म्हणाला, "आय कॅन अंडरस्टॅन्ड रागिणी, माय लव्ह! एनिवे मग पुढे काय झालं ते सांग ना?"
रागिणी: "मी ड्रग्जच्या नशेत असतांना राहुलने माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला पण मी अगदी वेळेवर शुद्धीवर येऊन तेथून कसेतरी पळाले. घरी काही कळू दिले नाही. राहुलला सांगून टाकले की आपल्यात जे झाले ते झाले पण आता यापुढे मला भेटू नकोस आणि आता मी लग्न करणार आहे. मग मी घरच्यांना लग्नासाठी तयार असल्याचे सांगितले. आणि मग माझ्या त्या नवऱ्याबद्दल मी तुला सांगितले आहेच. घरच्यांनी माझे लग्न एक बिझिनेस डील मिळावी म्हणून लावून दिले होते. म्हणजे ते एक डील होतं. दोन बिझिनेसमॅन फॅमिली मधले डील! नवरा मारकुटा निघाला. सॅडिस्ट निघाला!! छोट्या कारणांवरून मारायचा! रात्री सेक्स करतांना मला बांधून ठेवायचा! त्याने मला ऍक्टिंगमध्ये करियर करायची बंदी घातली होती. मग मी एके दिवशी बेमालूमपणे घरून पळून आले मुंबईत! दिल्लीतील एका मैत्रिणीच्या मदतीने!"
"ओह गॉड! मग पुढे?"
"घरच्यांनी मला सांगून टाकले की आता आपला संबंध संपला. मग नंतर राहुलला कसे माहित पडले ते माहित नाही पण माझ्या सिरियल्स पाहून त्याला कळले असावे की मी मुंबईत आहे आणि त्याने कुठूनतरी माझा फोन नंबर मिळवला असावा आणि आता मला तो ब्लॅक मेल करतोय की तो माझ्या नवऱ्याला माझा ठावठिकाणा सांगणार! मला भीती वाटतेय! माझा नवरा खूप खुनशी आहे. तो त्याचे गुंड पाठवेल! घटस्फोटाचा किंवा फसवणुकीचा दावा करून पैसे उकळेल किंवा माझ्यावर पुन्हा बलात्काराचा प्रयत्न करेल! मला आता पुन्हा दिल्लीला परत जायचे नाही. प्लिज! हेल्प मी! माझे घरचेही माझ्या नवऱ्याला साथ देतील, वेळ पडली तर!" असे म्हणून ती रडायला लागली.
"हे बघ रागिणी! मला तू हे सगळं सांगितलंस ते बरं केलंस! मी ब्राझीलहून तीन दिवसांत परत येईन...आणि हे बघ, रडू नकोस!", असं म्हणून तो विचारात गढला.
मनावरचा भार हलका होऊन सूरजने तिला समजून घेतल्याबद्दल रागिणीला हायसे वाटले.
बराच वेळ विचार करून सूरज पुढे म्हणाला, "तू असं कर! तू मला राहुलची काही माहिती, फोटो दाखव! मी ब्राझीलहून परत आल्यावर फोन करून त्याला मुंबईला भेटायला बोलाव! आपण काहीतरी आमिष दाखवू त्याला! तू त्याला भेटायला एकटी जा आणि मी लपून तुझ्या मागे असेनच! मग बघूया काय करायचे! डोन्ट वरी!"
मग तिने त्याला तिच्या मोबाईलवरचा राहुलचा फोटो दाखवला. फोटो बघताच त्याच्या चेहेऱ्यावर अस्वस्थता पसरली. तीला दिसू न देता त्याने तो स्वतःच्या मोबाईल मध्ये सेंड केला!
मग ब्राझीलला निघतांना तो तिला म्हणाला, "संशय येऊ नये म्हणून तू त्याला तो मागेल तेवढे पैसे पाठव. तोपर्यंत मी येतोच! आणि हो! त्याला माझ्याबद्दल काहीही सांगू नकोस! नाहीतर तो सावध होईल!"
सूरजला घेऊन विमान हवेतून ब्राझीलकडे निघून गेले. दोन कामवाल्या बाई गेल्यानंतर ती फ्लॅटमध्ये एकटीच होती. आता ती वाट बघत होती सूरज परत येण्याची! काल राहुलचा फोन आला होता आणि त्याने आज संध्याकाळच्या आत 50000 रुपये मागितले होते ते तिने त्याच्या अकाउंटवर पाठवले. आतापूरता प्रॉब्लेम मिटला. सूरज आल्यावर आता पुढचे काय ते ठरवायचे होते.
मुंबईला पळून आल्यानंतरच्या घटना तिला आठवू लागल्या:
मुंबईला बोरिवलीला तिची दिल्लीतली एक मैत्रीण राहात होती. ती एकटीच होती. गौरी सहानी. तिच्या रूमवर सहा महिने रागिणी राहिली कारण नंतर गौरीला कॅनडात कायमचा जॉब मिळाला. म्हणजे तिला आता फक्त सहा महिने होते!
मग रागिणीने तात्पुरता सेल्स वूमन म्हणून जॉब पकडला आणि तिच्या मैत्रिणीने गौरीने काही पैशांची मदत केली. मग जमतील तसे अनेक पार्ट टाइम जॉब पकडून तिने मॅडम अकॅडमी जॉईन केली. तेथे सुप्रिया, सोनीशी ओळख आणि मैत्री झाली. पार्ट टाइम जॉब सुरूच होता. टीव्ही किंवा सिनेमा कुठेतरी छोटासा का होईना रोल मिळणे अत्यावश्यक झाले होते अशातच मॅडम अकॅडमित डी. पी. सिंग यांचे सिरीयलसाठी ऑडिशन झाले. त्यात रागिणीची निवड झाली आणि अशा प्रकारे तिची करियरची सुरुवात झाली. मग गौरीची पैशांची परतफेड करतेवेळी गौरीने ते पैसे नाकारले आणि कॅनडाला जातांना फक्त ती एवढीच म्हणाली, "तुझी करियरची लाईन लागली ना! मग बास! पैसे मला परत नकोत. फक्त माझी आठवण ठेव म्हणजे झाले!"
yyyy