नंतर मुंबईतील सूरजच्या फ्लॅट वर -

सेक्स केल्यानंतर सूरज आणि ऑलिव्हिया एकमेकांच्या बाहुपाशात पहुडले होते.

"रागिणी इज आऊट ऑफ माय माईंड नाऊ. तुला भेटायला मला ब्राझीलला येण्याची वाट बघावी लागत होती पण आता रागिणी इज आऊट ऑफ माय माईंड अँड आऊट ऑफ धिस वर्ल्ड ओल्सो! मला तुम्ही दोन्ही आवडत होत्या!" हसत सूरज म्हणाला. पण अधून मधून त्याचे लक्ष टेबलावर पडलेल्या त्या काळ्या ब्राकडे होतं.

"तुला आम्ही दोन्ही आवडतात यात मला त्यात काही हरकत नव्हती पण रागिणीने आत्महत्या करून योगायोगाने का होईना माझं शेअर केलेलं प्रेम एकट्या मला दिलं! न मागता मला तू पूर्ण मिळालास!", ओलिव्हिया म्हणाली.

"खरं तर मलाही तेच हवं होतं कारण रागिणी आजकाल माझ्यावर जास्त संशय घ्यायला लागली होती. कुठून कुठून काय काय माहिती मिळवून आणि माझे फोनवरचे बोलणे चोरून ऐकून मला जाब विचारायला लागली होती ती!

मला ती वडलांच्या पार्टीत भेटली आणि आवडली पण मला तिने सिनेक्षेत्रापासून दूर राहावे असे वाटत होते. घरच्या प्रोडक्शन हाऊस मध्ये ठीक आहे पण त्यापुढे जाऊन चित्रपटात तिने काम करणे मला नको होते. तिची सुभाष भटच्या चित्रपटातली एक संधी मी मुद्दाम हुकवली! हे कळलं तर मला जाब विचारायला लागली ती!"

"यु आर सो बॅड! का केलंस असं? तू मला तर तसे नाही ना करणार?", ऑलिव्हिया म्हणाली.

"तू तिच्या साईडची आहेस की माझ्या? मी तुला असं करणार नाही ऑलि! तू मला खूप आवडतेस! आणि ठरल्याप्रमाणे आपण आता "लिव्ह इन" मध्ये राहू! माझ्याच फ्लॅटवर! आणि तुला काय वाटलं? रागिणी धुतल्या तांदळासारखी होती? नाही! तिचा एक बॉयफ्रेंड होता, तो मेल्यानंतर तिने ज्याच्याशी लग्न केलं त्याला सोडून पळून निघून आली होती ती मुंबईला!"

"तू जर माझ्या सुद्धा करियरच्या आड आलास तर मी आहे तशी युरोपला निघून जाईन!"

"तशी वेळ येणार नाही. आता मी चित्रपट निर्मितीत उतरणार आहे. सोबत हॉटेल आणि फूड चेंन्स आहेतच माझ्या. पप्पांशी माझे रागिणिच्या आत्महत्येवरून मतभेद झाल्यावर आता आम्ही एकमेकांना भेटत नाही. यापुढेही नाही भेटणार! ते त्या मूर्ख रागीणीची बाजू घ्यायला लागले मग मी त्यांना खडसावले. खरं तर पत्नीने कसं पतीला पूर्ण समर्पित व्हायला पाहिजे आणि रागिणी? बरं झालं आम्ही लग्न केलं नव्हतं! एनिवे! मेलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलू नये म्हणतात! चल बस झालं! तिचा विषय बंद! मस्तपैकी अंघोळ करून ये आता! पण मला तिच्या आत्महत्येचा अफसोस वाटतो आणि वाटत राहीन!"

आंघोळ केल्यानंतर ओलिव्हिया तयारी करून तिच्या मुंबईतील तिच्या एका मॉडेल मैत्रिणीला भेटायला निघून गेली.

तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत सूरज हसत मनात म्हणाला, "ओलिव्हिया, तू मला दाखवतेस तितकी स्मार्ट नाहीयेस! तुला एक गोष्ट माहीत नाही की पार्टीच्या रात्री घरी रागिणीच्या नकळत ती किचनमध्ये असतांना मी घरातील फ्यूज निकामी केला, अंधार केला. मग तिच्याशी भांडताना खांद्यावर धरून हलकेच तिला गॅलरीच्या कठड्याच्या बाजूला आणले आणि तिला ती बेसावध असतांना ढकलले! तिचा तोल गेला... मग काय! ही एक आत्महत्याच वाटली! कारण रागिणीला माझे असे सत्य गवसले होते जे अजून तुलाही माहीत नाही!

मी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज टोळीशी संबंध ठेऊन आहे. माझी "फूड चेन" ही माझे लोकांना दाखवायचे दात आहेत. त्यातले फूड्स एकदा खाल्ले की लोकांना एवढे चटक लावतात की पुन्हा पुन्हा ते तो पदार्थ खातात, कारण मी त्यात सौम्य असे एडीक्टिव्ह ड्रग्ज (नशिले पदार्थ) मिसळतो ज्यामुळे लोकांना त्याची खूप चटक आणि सवय लागते आणि मी भारतात विषेशतः मुंबई आणि दिल्लीत ड्रग्जचे जाळे पसरवून ड्रग्ज विकतो...

आणि आता पुढचं पाऊल म्हणजे, एका आंतरराष्ट्रीय डॉन कडून मला चित्रपटनिर्मितीसाठी करोडो पैसे मिळणार आहेत! पण त्याची अट एकच आहे, ती म्हणजे भारतातील आणि परदेशातील त्या डॉनशी संबंधित असणाऱ्या गुन्हेगारांच्या जीवनावर चित्रपट बनवायचा, त्यांचे उदात्तीकरण करायचे!"

असा विचार करून तो हसायला लागला आणि पुढे मनाशी विचार करत राहिला, "ओलिव्हिया, आता तुला मी माझ्या पिक्चर मध्ये काम देणार! तुझ्यासोबत राहून मजा करणार! पिक्चर बनवून करोडो कमावणार! फूड चेन मधून कमावणार! मालामाल होणार! जीवनातली सगळी सुखं उपभोगणार! माझ्या जीवनाचा एकच उद्देश आहे, अमाप पैसा कमावणे, मग तो कोणत्याही मार्गाने असो आणि मग त्या पैशांनी तुझ्यासारख्या आणि तुझ्यापेक्षाही सुंदर अशा अनेक स्त्रियांना उपभोगणार! अगं, स्मार्टनेसचा आव आणणारी तू एवढी बुद्धू आहेस की, तूला हे ही माहीत नाही की तुझा वापर मी ब्राझीलहून येतांना तुझ्या ब्रा मध्ये लपवून आणलेल्या एका नव्या अमली पदार्थाच्या तस्करीसाठी केला आहे. विशिष्ट प्रकारे खास बनवून घेतलेल्या त्या काळ्या ब्राची शिवण उसवून मी आता त्यातून ड्रग्जची पावडर काढणार! आणि पुन्हा जशीच्या तशी तुझी ब्रा तुला परत! काय? बरोबर ना?"

काही दिवसांनंतर, सूरज आणि त्याच्या नव्या गर्लफ्रेंडबद्दल न्यूज चॅनेल्सनी वेगवेगळे प्रोग्राम्स केले. सूरजने एका पत्रकार परिषदेत जाहीर केले, "आता मी चित्रपट निर्मितीत उतरणार आहे. माझी स्वर्गीय मैत्रीण रागिणी हिला मी माझा पहिला चित्रपट समर्पित करणार! माझ्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव सुद्धा रागिणी एंटरटेनमेंट हाउस लिमिटेड हेच असणार आहे."

याच वेळेस दूर आकाशात कुठेतरी एक अतृप्त आत्मा पृथ्वीवर पुन्हा येण्यासाठी काय करावे लागेल या विवंचनेत भटकत होता पण त्याला अजून मार्ग सापडत नव्हता.

रागिणीची केस पोलिसांनी बंद करून टाकली होती कारण सूरजने पोलिसांना सांगितले होते की, "ती तिच्या पूर्वायुष्याबद्दल खूप टेन्शन घ्यायची. तिचे विवादास्पद पूर्वायुष्य मी खुल्या मनाने स्वीकारले होते. पण जेव्हा टीव्हीवर त्याबद्दल चर्चा झाली त्यानंतर ती खूप तणावाखाली होती. मी तिला खूप समजावलं पण ...", असे म्हणतांना त्याला खोटे रडू कोसळले होते.

मनातल्या मनात सूरज म्हणाला, "आणि एखाद्या पत्रकाराने एखाद्या कलाकाराचे खरे पूर्वायुष्य जगासमोर आणले म्हणून त्या कलाकाराने आत्महत्या केली तरी त्या पत्रकाराला दोषी धरता येणार नाही कारण मनोरंजनाच्या या वलयांकित क्षेत्रात अशा अनेक गोष्टी पचवायची हिम्मत असावी लागते!"   

त्यावेळेस रागिणीची कॅनडातील मैत्रीण मात्र अस्वस्थ होती. तिला एकंदरीत रागिणीच्या नेहमी येणाऱ्या फोन कॉल वरून आणि एकंदरीत बोलण्यावरून ती आत्महत्या करेल असं कधी वाटलं नव्हतं. मात्र कॅनडात राहून याबद्दल ती पोलिसांना काय आणि का आणि कसे सांगणार?

सूरजला लवकरच एक फोन आला, "सर साहेब, बाजवा बोल रहा हूं!"

"बोल बाजवा!"

"सरसाहेब, व्हेरोनिका को आपकी याद आ रही है! मिलने बुलाया है आपको!"

"साले, बाजवे! सिर्फ इतना बताने के लिए मुझे कॉल किया? मुझे पता है! उसने मुझे कॉल किया था!"

"सरसाहेब, और एक दुसरी जरुरी बात है, भाईने आपके लिए संदेसा भेजा है!"

"क्या संदेसा है? बोल जलदी!"

"दुबई में भाई का एक चचेरा भाई है "कातील खान", उसपर ऍक्टिंग और कॉमेडी का भूत सवार है!"

"हां हां, आगे बोल!"

"तो भाई चाहते है की आप पहले एक कॉमेडी मूव्ही बनाव और उसने भाई के भाई को हिरो लेलो!

"चलो ले लिया! आगे बता!"

"कातील को अब भाई के लिए जुर्म करने का कंटाला आगया है और उसका दिल बॉलीवूड हिरोईन माया माथूर पे आ गया है! तो मूव्ही में उसको हिरोईन लेना है!"

माया माथूर त्याच्या चित्रपटाला हो म्हणेल की नाही याबद्दल सूरजच्या मनात शंका दाटायला लागली पण...

बाजवा म्हणाला, "अगर माया ना बोले ना, तो भाई को बोलो, भाई को अपने तरिके से काम करवाना आता है! चलो अब फोन रखता हूं!"

सूरज विचार करू लागला.

"भाई म्हणतो आहे तर कॉमेडी मूव्ही जरूर बनवू, लागलं तर माया माथूरला धमकावू! ते काही कठीण नाही! पण व्हेरोनिकाला भेटण्याची आता मला जास्त ओढ लागली आहे कारण तिच्यासोबत फार कमी क्षण मला राहायला मिळाले आहेत आणि आता ऑलिव्हिया भारतात आल्यानंतर व्हेरोनिकाला ब्राझीलला जाऊन भेटणे थोडे चॅलेंजिंग झाले आहे!"

सूरजच्या चेहऱ्यावर व्हेरोनिकाला भेटण्याची अनावर ओढ दिसत होती. त्याला आता ऑलिव्हियाला काहीतरी कारण सांगून ब्राझीलला जावे लागणार होते.

आधी व्हेरोनिका मग भाईची कॉमेडी मूव्ही!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel