एका पारध्याने शेतात पक्षी धरण्यासाठी आपले जाळे पसरून ठेवले व तो एका झाडाआड लपून जाळ्यात पक्षी कसे काय सापडतात ते पहात बसला. काही वेळाने एकामागून एक पक्षी त्या ठिकाणी येऊ लागले. ते थोडा वेळ तेथे बसत आणि उडून जात. याप्रमाणे थोडे थोडे पक्षी तेथे दिवसभर येत होते. पण ते अगदी थोडे असल्यामुळे त्यांना पकडावे असे त्या पारध्याला वाटले नाही. खूप पक्षी एकदम पकडावे असे त्याच्या मनात होते. शेवटी संध्याकाळ झाली व सगळे पक्षी आपापल्या घरट्यात निघून गेले. मग निराश होऊन त्या पारध्याने जाळे काढून घेतले व नशिबाला दोष देत तो घरी गेला.
तात्पर्य
- कोणत्याही कामात उतावीळपणा जसा चांगला नाही त्याप्रमाणे दिरंगाईही योग्य नाही. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.