एक रानडुक्कर आपल्या दाढेला झाडाच्या बुंध्यावर धार लावत होता. तेथे कोल्हा आला व त्याला विचारू लागला, 'अरे, तुझ्यावर कोणी शत्रू चाल करून आल्याचं चिन्ह तर इथे काही दिसत नाही, असं असता तू उगाच आपली दाढ घासत बसला आहेस याचं कारण काय?' डुक्कर त्यावर म्हणाले, 'मित्रा, माझ्यावर कोणी चाल करून आलं नाही, हे खरं. पण रिकाम्या वेळात आपल्या हत्याराला धार लावून ते तयार ठेवणं बरं, कारण संकटाच्या वेळी तितकी तयारी करायला वेळ मिळेलच असं थोडंच आहे?'
तात्पर्य
- घराला आग लागल्यावर विहीर खणायला निघणे हे मूर्खपणाचे होय. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.