एक घोडागाडी जोरात चालली असता तिच्या चाकावर बसून एक माशी स्वतःशीच म्हणाली, 'मी किती धूळ उडवते आहे !' काही वेळाने ती माशी घोड्याच्या पाठीवर बसली व पुन्हा आपल्याशीच म्हणाली, 'घोड्याला पळायला लावणारं माझ्यासारखं दुसरं कोणी आहे का ?'

तात्पर्य

- दुसर्‍याने केलेल्या कामाचे श्रेय आपल्याकडे घेउन त्याबद्दल बढाई मारीत बसण्याची बर्‍याच लोकांना सवय असते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel