एकदा एक कावळा मांसाचा तुकडा तोंडात धरून झाडावर बसला होता. ते एका कोल्ह्याने पाहिले व त्याने कावळ्याच्या सौंदर्याची स्तुती करण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, 'तुझं शरीर जर इतकं सुंदर आहे तर तुझा आवाज किती गोड असेल !'
ते ऐकून कावळ्याने गाणे म्हणण्यासाठी तोंड उघडले. पण तेवढ्यात त्याच्या चोचीतला मांसाचा तुकडा खाली पडला आणि तो पटकन उचलून कोल्हा कावळ्याच्या मूर्खपणाला हसत चालता झाला.
तात्पर्य
- खोट्या प्रशंसेला भुलून लबाडांच्या नादी कधी लागू नका. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.