एका आरशात एका तलावाचे चित्र बसविले होते. ते पाहून येथे आपल्याला पाणी मिळेल म्हणून एका पारव्याने त्यावर उडी मारली. त्यामुळे त्याच्या पंखाला आणि चोचीला चांगलेच लागले आणि तो खाली पडला. जवळच काही मुले खेळत होती. त्यांनी त्याला पकडून खेळावयास नेले.
तात्पर्य
- अविचाराने कोणत्याही कामास हात घालणे योग्य नाही. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.