एकदा एक किडा उकिरड्यातून तोंड बाहेर काढून ओरडून म्हणाला, 'कुणाची प्रकृति बरी नसल्यास त्याने माझ्यापाशी यावं. माझ्याकडे खूप रामबाण औषधं आहेत त्यामुळे मी कुठलाही रोग बरा करू शकेन !'
तेव्हा एक खोकड त्याला म्हणाला, 'अरे, तुला स्वतःच्या अंगातली घाण काढून टाकता येत नाही, तो तू इतरांचे रोग काय बरे करणार?'
तात्पर्य
- ज्याला स्वतःचे दोष दूर करता येत नाहीत त्याने दुसर्याचे दोष दूर करण्याचा आव आणू नये. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.