एकदा देवाच्या मनात, सगळ्या पशु व पक्षी यांमध्ये कोणाची पिल्ले सुंदर दिसतात ते बघावे असे आले. तेव्हा त्याने सर्व पशुपक्ष्यांना आपापल्या पिलांसह दरबारात हजर राहाण्याचा हुकूम केला. हुकुमाप्रमाणे सर्व पशुपक्षी आपापल्या पिलांसह देवाच्या दरबारात हजर झाले. तेव्हा एक माकड आपल्या पोरांना घेउन देवापुढे आले व म्हणाले, 'देवा ! इतकी सुंदर मुले सर्व जगात कुणाचीच नसतील.'
तात्पर्य
- स्वतःची मुले प्रत्येकाला फार सुंदर वाटतात. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.