एक मुलगा शेतात खेळून दमला आणि जवळच एक विहीर होती तिच्या अगदी कडेवर जाऊन निजला. ते पाहून दैवाने त्याला हालवून जागे केले आणि म्हटले, 'मुला मी आता तुझा जीव वाचवलाय हे लक्षात ठेव. तू जर आता लोळत जाऊन विहिरीत पडला असतास तर सगळ्यांनी मला दोष दिला असता. पण खरं सांग, असं झालं असतं तर त्यात दोष कोणाचा असता ? माझा की तुझा ?'
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.