अस्वल माणसाच्या प्रेताला शिवत नाही. एकदा एक अस्वल म्हणाले, 'मानव जातीविषयी मला इतकी आदरबुद्धी आहे की मला जर कोणी पृथ्वीचं राज्य देऊ केलं तरी माणसाच्या प्रेताला कधी शिवणार नाही.' हे ऐकून कोल्हा म्हणाला, 'अरे, तू म्हणतोस ते कदाचित खरं असेल. पण माणसाच्या प्रेताची तुला जशी दया येते, तशीच जर जिवंत माणसाची येईल, तर तुझ्या बढाईला काही तरी अर्थ आहे, असं मी समजेन.
तात्पर्य
- ज्याचा उपयोग करून घेता येणे अशक्य असते त्याबद्दल आपण निरपेक्ष आहोत असे सांगण्याचा प्रयत्न करणे हा केवळ ढोंगीपणा आहे. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.