दोघेजण प्रवासाला जाण्यास निघाले असता त्यांनी असे ठरविले की प्रवासात जर एखाद्यावर संकट आले तर दुसर्‍याने त्याला मदत करायची. एका अरण्यातून जाताना त्यांच्या अंगावर एक अस्वल धावून आले. त्यावेळी त्यापैकी जो चपळ होता तो झटकन झाडावर चढला. जो जाड होता त्याला पळता येईना तेव्हा तो आपला श्वास कोंडून मेल्याचे सोंग घेऊन जमिनीवर पडला. अस्वलाने त्याच्याजवळ येऊन हुंगून पाहिले व हे प्रेत आहे असे समजून त्याला काही इजा न करता ते निघून गेले. अस्वल गेल्यावर झाडावरला माणूस खाली उतरला व मित्राला विचारू लागला, 'मित्रा, त्या अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले, त्यावर मित्राने उत्तर दिले, 'अस्वलाने मला सांगितले की तुझ्यासारख्या लबाड माणसावर विश्वास ठेवू नकोस.'

तात्पर्य

- सर्व व्यवस्थित असताना इतर लोक चांगले बोलतात, आश्वासने देतात. पण संकट आले की, जो तो स्वतःचा जीव वाचविण्याचे बघतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel