'मला आपल्या बिळात जागा द्याल तर मी तुमची फार आभारी होईन.' अशी एका साळूने सापांना विनंती केली. सापांनी अविचारांनी ती तिची विनंती मान्य करून तिला आपल्या बिळात येऊ दिले. ती आत शिरताच तिची काट्यासारखी तीक्ष्ण पिसे अंगास रुतून सापांना फार दुःख झाले. मग ते तिला म्हणाले, 'साळूबाई, आता तुम्ही येथून जाल तर बरं होईल. तुमचा हा उपद्रव आमच्याच्याने सहन करवत नाही.' हे ऐकताच साळू म्हणाली, 'मी का जाईन ? मला तर ही जागा फार आवडली, ज्यांना ती आवडत नसेल त्यांनी पाहिजे तर खुशाल जावं.'
तात्पर्य
- काही लोक इतके दुष्ट असतात की एकदा त्यांना दुसर्याच्या घरी आश्रय मिळाला की हळूहळू त्याला घरातून बाहेर काढून ते घर ते बळकावून बसतात. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.