एक कावळा तहानेने व्याकुळ होऊन पाणी शोधत असता एक सुरई त्याला दिसली. तिच्यात पाणी फारच थोडे होते व ते अगदी तळाशी होते. त्याने आपली चोच आत घालून पाहीली, पण ती पाण्यापर्यंत पोहचत नव्हती. त्याने खूप प्रयत्न केले पण पाण्याचा एक थेंबही त्याला मिळाला नाही. मग त्याने बरेच खडे जमा केले व ते त्या सुरईत टाकले. तेव्हा त्याची चोच पोहोचण्याइतके पाणी वर आले व ते पिऊन त्याने आपली तहान भागविली.
तात्पर्य
- अडचणीच्या वेळी हुशार माणसे काहीतरी युक्ती योजून संकटातून सुटका करून घेतात. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.