एक बोकड एका डोंगराच्या माथ्यावर चरत असता एकाएकी मोठे वादळ झाले. त्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तो बोकड जवळच्या दाट झाडीत जाऊन बसला. ती जागा शांत व निवार्‍याची असल्याने त्याला तेथेच झोप लागली. काही वेळाने वादळ शांत झाल्यावर तो जागा झाला व घरी जाण्यास निघाला, तेव्हा त्याला असे आढळून आले की, त्याच्या लोकरीत काटेरी झाडाची एक फांदी अडकली आहे. थोडा वेळ हिसकाहिसकी केल्यावर बरीचशी लोकर गेल्यावर ती फांदी बाजूला झाली व तो आपल्या घरी गेला.

तात्पर्य

- काहीही अपेक्षा न ठेवता आश्रय देणारे किंवा दुसर्‍याचे रक्षण करणारे लोक थोडेच असतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel