एका कोल्ह्याने सिंहाला प्रथमच पाहिले. तेव्हा तो भिऊन सिंहाच्या पाया पडला व दीनपणे बोलू लागला. दुसर्या भेटीत तो धीराने त्याच्या तोंडाकडे पाहून बोलला व तिसर्या वेळी तर अगदी त्याच्या जवळ जाऊन बोलला व त्याच्याशी सलगी करू लागला.
तात्पर्य
- अति परिचय झाला म्हणजे हलके लोक मोठ्यांचा मान ठेवत नाहीत. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.