एका घरात काही धनगर बकरी मारून मोठ्या आनंदाने जेवत असता बाहेरून एक लांडगा त्यांच्याकडे डोकावून पाहू लागला. मग तो आपल्या मनात म्हणाला, 'वा रे वा ! ह्या धनगराने जर मला बकरी मारून खाताना पाहिले असते तर केवढा मोठा आरडाओरडा केला असता.'

तात्पर्य

- जे काम आपण निःशंकपणे करतो तेच दुसर्‍यांनी केले असता आपण दुसर्‍यांना दोष देतो. तर असे न करता दुसर्‍याच्या बर्‍या-वाईट कर्माचा जसा विचार करतो तसाच आपल्या कर्माचाही विचार करावा.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel