विक्रांत देशमुख
युवा मोरया सामाजिक संस्था, सातारा

नमस्कार,

सहकार्य हीच खरी उन्नती, या ब्रीद वाक्यातून प्रेरित होऊन गेल्या ७ वर्षापेक्षा जास्त काळापासून युवा मोरया सामाजिक संस्थेचे रक्तदान या विषयावर काम चालू आहे.

आपल्या समाज्यामधे रक्तदानाचे प्रमाण कमी आहे, हे मान्य आहे पण जे काही रक्तदाते रक्तदान करतात त्याचे पुढे काय होते? त्याचा वापर नक्की कोणाला होतो? ते गरजू रुग्णांपर्यंत कसे पोहोचवायचे? या विषयी माहिती नसते.

युवा मोरया सामाजिक संस्था रक्तदान शिबिराचे आयोजन करित असून त्याचा पुरवठा अत्यंत गरीब व गरजू रुग्णांना करत असते. आता आपल्या मनात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे  या संस्थेची स्वत:ची रक्तपेढी असणार , तर असे नसून संस्था सरकारी रक्तपेढया, तसेच अल्प प्रमाणात खाजगी रक्तपेढया यांना रक्तदान शिबिरे देत असून त्यांच्या आधारे महाराष्ट्र मधील रुग्णांना त्या त्या शहरातील रक्तपेढयाच्या माध्यमातून रक्त उपलब्ध करून देत असते.

जर एखाद्या शहरात एखाद्या रक्तगटाची आवश्यकता असेल आणि ते रक्त उपलब्ध नसेल तर, अशा वेळी संस्था आपल्या संपर्कामधील रक्तदाता तेथे पाठविते.

आपल्याला फक्त रक्तगटच माहित असतात, पण रक्तगटामध्ये काही घटक असतात  हे माहित नसते. उदा. O +ve  हा रक्तगट असेल तर त्या रक्तगटामध्ये होल ब्लड म्हणजे रक्तदान केल्यानंतरचे रक्त. त्यानंतर पी.सी.व्ही म्हणजे रक्तामधील लाल पेशी . प्लाझ्मा म्हणजे रक्तामधील पाणी तसेच प्लेटलेट म्हणजे रक्तमधील पंढऱ्या पेशी हे आपल्या रक्तामधील वेगवेगळे घटक आहेत. आता आपल्या मनात पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे याचा वापर कसा व कोणत्या आजारात होतो, तर स्त्रियांच्या डिलेव्हरीच्या काळात किंवा एखाद्या अपघातात होल ब्लड चा वापर  होतो, होल ब्लड मध्ये इतरही घटक समावलेले असतात. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात रक्त नसेल तेव्हा पी.सी.व्ही. हा घटक दिला ज़ातो. तसेच प्लाझ्मा चा वापर हा शरीरामधील रक्त पातळ करण्यासाठी केला जातो. सर्पदंश झालेल्या रुग्णांसाठी प्लाझ्माचा वापर केला जातो. तसेच प्लेटलेट चा उपयोग डेंग्यू झालेल्या रुग्णांनच्या बचावासाठी केला जातो, कारण डेंग्यू चे विषाणू हे शरीरातील पांढऱ्या पेशी नष्ट करत असतात अशा वेळी प्लेटलेट चा उपयोग व्यक्तीचे प्राण वाचविण्यास उपयुक्त ठरतो.

आपल्या महाराष्ट्रामध्ये काही निवडक सरकारी रक्तपेढया मध्ये रक्तामधील घटक वेगळे करण्याची प्रक्रिया चालू आहे, खाजगी रक्तपेढया ह्या रक्तामधील घटक वेगळे कत असतात, त्यामुळे ते रुग्णांकडून रक्ताचे किंवा इतर घटकांचे पैसे घेतात युवा मोरया सामाजिक संस्था ही सरकारी आणि खाजगी रक्तपेढया च्या माध्यमतून रक्तदान शिबिरे घेत असल्यामुले संपूर्ण महाराष्ट्र भर रक्त मोफत व रक्तमधील घटक सवलतीच्या दरामध्ये मिळत असतात.

आपण रक्तदान करा व गरजू रुग्णांचे प्राण वाचवा, रक्तदान हे जीवनदान आहे. 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel