संचितासी दग्ध करी ऐसा कोण । सद्‌गुरुवांचोन जाण मना ॥ १ ॥

यालागीं सद्‌गुरु असावा उत्तम । जेणें निमे श्रम संसाराचा ॥ २ ॥

त्रिविध तापासी कोण करी शांत सद्‌गुरु एकान्त न जोडतां ॥ ३ ॥

जन्ममरणाची कथा कैं निवारे । सद्‌गुरु निर्धारें न भेटतां ॥ ४ ॥

वासना निःशेष निवारेल तेव्हां । भेटेल तुकोबा सद्‍गुरु तो ॥ ५ ॥

बहिणी म्हणे माझा जाऊं पाहे जीव । का हो न ये कींव तुकोबा ॥ ६ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel