देऊळांत कथा सर्व काळ होत । श्रवण करीत दिनरात्रीं ॥ १ ॥

तुकोबाची कथा वेदांतील अर्थ । पावे माझें चित्त समाधान ॥ २ ॥

तुकोबाचें ध्यान पूर्वी कोल्हापुरीं । जें स्वप्नामाझारीं देखियेलें ॥ ३ ॥

तेंचि ध्यान डोळां प्रत्यक्ष देखोनी । आनंद लोचनीं हेलावत ॥ ४ ॥

रात्रंदिन निद्रा न ये तिळभरी तुकोबा अंतरीं प्रवेशला ॥ ५ ॥

बहिणी म्हणे येती सुखाचे डोलावे । जाणती अनुभवे जाणते जे ॥ ६ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel