मंबाजी गोसावी भ्रतारासी म्हणे । तुम्ही शिष्य होणें स्त्रियायुक्त ॥ १ ॥
माझा हेत आहे तुम्हीही हरिभक्त । दिसतां विरक्त उभय वर्गे ॥ २ ॥
ऐकोनी ते गोष्टी दोनचार वेळां । मग त्या प्रांजळा सांगितलें ॥ ३ ॥
आम्ही अनुग्रही आहों जी पूर्वीच । न वाटे त्या सत्य गोष्टी कांहीं ॥ ४ ॥
भ्रतारें त्याप्रती सांगितलें सर्व । कोल्हापुरीं पूर्व वर्तलें जें ॥ ५ ॥
ऐकोनीया द्वेष संचरला मनीं । म्हणे काय स्वप्नीं समाधान ॥ ६ ॥
नाहीं गुरुसेवा घडली जोंवरी । हस्तक हा शिरीं सद्गुरूचा ॥ ७ ॥
तोंवरी तो गुरु कासयाचा खरा । शूद्राचीया अंतरा ज्ञान कैचें ॥ ८ ॥
स्वप्नींचा अनुग्रह गुरु केला शूद्र । तोही बळीभद्र ज्ञानहीन ॥ ९ ॥
तुम्हांसी वाळीस ब्राह्मणाचे पंक्तिं । तुम्ही गुरुभक्ती नका सांगूं ॥ १० ॥
बहिणी म्हणें ऐसें मंबाजी बोलिला । द्वेषही मांडिला तेच क्षणीं ॥ ११ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.