रामेश्वरभट्टें ऐकिला वृत्तान्त । धांवोनी त्वरीत तेथ आला ॥ १ ॥

तुकोबाचें तींहीं घेतलें दर्शन । गाय तेही पूर्ण पाहियेली ॥ २ ॥

दोहीचे पाठीचा दिसे एक भाव । रुदनीं ते सर्व प्रवर्तले ॥ ३ ॥

तुकोबाचे पार वर्णिलासा कोण । कलियुगीं जाण प्रल्हाद हा ॥ ४ ॥

सर्वांतर साक्षी करोनीया स्तुती । स्वमुखें रमती आपुलिया ॥ ५ ॥

बहिणी म्हणे लोक बोलती सकळ । तुकोबा केवळ पांडुरंग ॥ ६ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel