तुटकें संचित जालें शुद्ध चित्त । अंतरींचा हेत ओळखिला ॥ १ ॥
कृपा केली देवें इंद्रायणीतीरीं । देहुग्रामीं थोर भक्तिपंथ ॥ २ ॥
तेथें पांडुरंग देवाचें देऊळ । राहावया स्थळ प्राप्त झालें ॥ ३ ॥
तुकाराम संत संताचें कीर्तन । तिन्ही काळ तीन दृष्टीपुढें ॥ ४ ॥
नमस्कार तया न घडे पतिभयें । परि चित्त राहे सदा पायीं ॥ ५ ॥
बहिणी म्हणे ऐसे मास झाले सात । अवघेंची संचीत सरो आलें ॥ ६ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.