आनंदे सद्गद जाहलीं इंद्रियें । तुकारामपाय आठवले ॥ १ ॥
होऊनी सावध उघडिले नेत्र । आठवला मंत्र षडक्षरी ॥ २ ॥
ठसावला ध्यानीं मनाचिये ठायीं । आणिक काहीं आठवेना ॥ ३ ॥
बहिणी म्हणे हात घातला मस्तकीं । देह तो या लोकीं आढळेना ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.