तें सुख सांगतां वाचे पडे मौन । जाणता ते धन्य गुरुभक्त ॥ १ ॥
झालासे आनंद इंद्रियाचे द्वारीं । बैसलें शेजारीं चैतन्याचे ॥ २ ॥
घट हा बुडावा जैसा डोहाआंत । न फुंटतां ओतप्रोत पाणी ॥ ३ ॥
बहिणी म्हणे तैसें झालें माझें मना । तुकाराम खुणा ओळखी त्या ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.