आशिष अरुण कर्ले
३२ शिराळा (सांगली)
९७६५२६२९२६

परीक्षेची तुलना कोणी वेगवेगळ्या खेळाबरोबर करतात तर कोणी तिला शर्यत समजतात पण जोपर्यंत पवार सरांनी परीक्षा म्हणजे काय हे सांगितलं नव्हतं तोपर्यंत परीक्षा म्हणजे नेमकं काय हे मला कळलंच नव्हतं. मला वाटायचं की परीक्षा म्हणजे फक्त एक वर्गातून दुसऱ्या वर्गात अथवा करिअर साठी असणारा महत्वाचा टप्पा

पण जेव्हा पवार सरांनी परीक्षा म्हणजे काय याबाबत मार्गदर्शन केलं त्यांचे विचार मांडले तेंव्हापासून परीक्षेकडे बघायचा दृष्टिकोनच बदलला.

सर बोलायचे की परीक्षा ही कधीच तुमचे ज्ञान तपासण्यासाठी नसते जर तस असत तर यापूर्वी आपण जे काही शिकलो ते अजूनही आपल्या लक्षात राहील असत परीक्षा ह्या ज्ञान तपासण्यासाठी नाहीत तर त्या तुमचं व्यक्तिमत्त्व तपासण्यासाठी असतात. तुमच्या व्यक्तिमत्वाला चांगलं वळण देण्यासाठी परीक्षा असतात, यापरीक्षांमधुनच समजत की तुमच्यात किती संयम आहे तुम्ही एखाद काम किती आत्मीयतेने निष्ठेने आणि श्रद्धेने करता हे समजत, परीक्षा काही फक्त तुमचं ज्ञान तपासण्यासाठी नसतात.

विश्वास नांगरे पाटील सर सांगतात की तुम्ही शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर तुम्हाला युद्धाच्या काळात जास्त रक्त सांडाव लागणार नाही. तर तुम्ही शांततेच्या काळात घाम गाळलात का ऐन युद्धात तुम्हाला रक्त सांडाव लागलं हे या परीक्षेतूनच समजत.

कुठल्याच परीक्षेतील यश पुर्णपणे तुमचं भवितव्य ठरवू शकत नाही. परीक्षा ही काही शर्यत नाही की तिथं तुम्हाला जिंकलच पाहिजे. परीक्षेत तुम्ही यश वा अपयश मिळो इथून तुम्हाला जीवनासाठी चांगला अनुभव मात्र मिळतो.

परीक्षेत तुम्हाला यश मिळालं तर तुम्हाला पुढच्या दरवाज्याची किल्ली मिळते पण तुम्ही जरी अपयशी झालात तरी निराश व्हायची आवश्यकता नसते कारण इतर अनेक दरवाजे खुले असतात फक्त आपण तिकडे लक्ष देत नाही.

परीक्षेकडे फक्त एक स्पर्धा म्हणून बघून आपण तिच्या खऱ्या अर्थाकडे दुर्लक्ष करतो आणि मग आपल्याला परीक्षा म्हणजे काय हे शेवटापर्यंत समजत नाही.

आपल्याकडे परीक्षेतील यश हेच अंतिम यश समजतात, कित्येक जण या परीक्षेच्या निकालाच्या  भितीने आत्महत्या करतात कित्येकदा परीक्षेत चांगलं यश मिळणारअसूनही निकालाच्या भीतीपोटी मुलं आत्महत्या करतात.

परीक्षेच्या काळात पालक देखील मुलांना अभ्यासच खूप दडपण आणतात....

म्हणून आपण परिक्षेकडे फक्त एक स्पर्धा म्हणून न पाहता वेगळ्या दृष्टीने पाहिलं पाहिजे, जर आपण अस केलं तरच आपल्याला परीक्षेचा खरा अर्थ समजेल प्रत्येकपरीक्षा ही नवनवीन अनुभव देऊन जाईल जगायला एक नवीन दिशा देईल जीवनाच्या प्रत्येक वाटेवर चांगलं मार्गदर्शन करेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel