मनोज आहेर
सदस्य, टीम मैत्री संवाद
8097615809

नागरिक शास्त्र..

या नावातच सगळं काय येतं..

भारत या देशाचा नागरिक म्हणून माझे काय काय अधिकार आणि कर्तव्य आहेत  आणि ते मला कुठून आणि कसे मिळालेत याचा अभ्यास म्हणजे नागरिक शास्त्र होय...

पण आजकाल या विषयाला शालेय पेपर मध्ये म्हणावे तसे वेटेज नसल्यामुळे हा विषय ऑप्शन ला टाकण्याचा कल दिसून येतोय..

 ' शालेय विदयार्थी हा उद्याचा भारतीय डेमोक्रॅटिक डिव्हिडंड आहे.'

असं आमचे मित्र उमेश खाडे आम्हाला सांगतात..

आणि ते खरेच आहे

मानवी आयुष्यातील पायाभरणीचा काळ जितका भक्कम तितकी इमारत मजबूत.

आपला समाज अशाच मानवी इमारतींनी घडला व घडवला गेला आहे. कोणत्याही क्षेत्रातल्या मोठ्या व्यक्तीचं उदाहरण आपण जर पाहिलं, तर ते याचं श्रेय शालेय आयुष्यात झालेल्या, केलेल्या संस्कारांना देतात आणि हे संस्कार किंवा सवयी लावण्याचं श्रेय शिक्षक, कुटुंब, नातेवाईकांचा गोतावळा यांबरोबरच सभोवतालच्या समाजालाही जाते.

तर अशी व्यक्तीचं घडण वा बिघडण हे दहा वर्षाच्या शालेय आयुष्यावर फार अवलंबून असते.

आपल्या संविधानाचं महत्व सर्व विद्यार्थ्यांना समजावं, उमजाव आणि त्याचं महत्त्व पटाव म्हणून संविधानाचा सार असलेली उद्देशिका प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानावर शिक्षण मंडळाने छापली आहे..

पण ती किती वाचली जाते आणि खरचं नुसतं वाचून त्याच महत्त्व पटून ती किती विद्यार्थ्यांना पचते हा चर्चेचा विषय होऊ शकतो.

जगायला शिकवते ते शिक्षण अस जर आपण म्हणत असू तर नागरिक शास्त्र हे तर जीवन जगण्याचं शास्त्र आहे मग हे नुसतं पुस्तक वाचून कस समजणार ???

भारताचं संविधान आणि तोच पाया असलेली लोकशाही यांचं महत्व तुम्ही वर्गाच्या चार भिंती मध्ये बेंचवर बसून नुसतं वाचुन विद्यार्थ्यांना कळेल अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे कोल्ह्याला द्राक्ष आंबट का लागली असा प्रश्न विचारण्यासारखे होईल.. नाही का???

तसेच आजकालच्या बाय वन गेट वन फ्री आणि जे जे फुकट ते ते पौष्टिक मानणाऱ्या जमान्यात त्याच प्रकाराच्या धर्तीवर तुम्ही फक्त जन्म घ्या आणि स्वातंत्र्य फुकटात मिळवा अशा सवलतीत मिळालेल्या स्वातंत्र्याची  किंमत अशी रट्टा मारून नाही कळणार.

जगभरात कौतुक केले गेलेले

भारतीय संविधान, त्याचा सार असलेली उद्देशिका आणि त्या उद्देशिकेत दिल्या गेलेल्या प्रत्येक वाक्य तसेच शब्द आणि शब्द यांमागे फार मोठा अर्थ दडलेला आहे..

ते मिळवणे हा संविधान निर्माणकर्त्यांचा मूळ उद्देश होता..

पण आजकालच आपल्या आजुबाजूचं वातावरण आणि लोकशाही बद्दल(गैरसमजातून) असलेले नकारात्मक विचार आपल्या लोकशाहीला फार मारक ठरत आहेत.

आणि जे आपल्या संविधानाबद्दल जाणून नाही आहेत(शिक्षित आणि अशिक्षित असे बहुतेक सगळेच) असे प्रौढ लोकच हे पसरविण्याच काम करतायेत आणि तेच विचार समाजमाध्यम किंवा इतर प्रसारमाध्यमांमधुन विद्यार्थ्यापर्यंत पोचतायेत..

पण हे सगळं सांगण्यासाठी आपण आताची आजुबाजूची परिस्थिती सुद्धा दाखवणं आणि तिचं विश्लेषण करून त्यातील त्रुटी समजावणं तितकचं  गरजेचं आहे..

मूल्य कधीही नुसती वाचून आत्मसात होतील का हो ?

खरचं असा प्रश्न प्रत्येकाने स्वतः ला विचारा बरं.

आणि बघा त्याच प्रामाणिक उत्तर काय येत ते??

अर्थातच नाही..

मग संविधानातील मूल्य जी आपल्या उद्देशिकेमध्ये नमूद केलेली आहेत ती अंगी उतरवण्यासाठी काय काय करू शकतो याचा आपण विचार करूया.

मला एक कल्पना सुचतेय बघा तुम्हांला जमते का?

शिक्षकांनी आपल्या मूल्यशिक्षणाचा तास जर संविधानिक मूल्य रुजविण्यासाठी वापरला तर..

स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता हे नुसते शब्द नसून जगण्याचे मार्ग आहेत.

आणि हा एक एक शब्द अंगी व्यवस्थित बाणवला जरी गेला ना तरी आपल्या आजूबाजूचे निम्मे प्रॉब्लेम कमी होऊ शकतात.

म्हणजे एखाद्याच अस्तित्व, आवड, त्याने/तिने काय खायचं, काय प्यायचं इथपासून ते कुठे राहायचं या गोष्टी तसेच त्याने चार भिंतीत कोणाबरोबर राहायचं तसेच काय करायचं हे सर्व जोपर्यंत इतरांना हानी पोहोचवत नाही तोपर्यंत संविधानात आणि लोकशाहीत दिलेल्या हक्काप्रमाणे प्रत्येकाला आपापल्या मनाप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि ही एक गोष्ट जर आपल्याला कळली तर निम्म्याच्या वर वादविवाद, हाणामाऱ्या आणि हिंसा कमी होऊ शकतील.

सध्या आपण जे सरळ सरळ टॅग लावून मोकळे होतो ना की आजची युवा पिढी वाया गेली आहे ते लावताना ही विचार करायला करायला हवा कारण आपण किती दिवस शिता वरून भाताची परीक्षा करत राहणार.

एखाद्या व्यवस्थेत बदल घडविण्यासाठी तुम्हांला फक्त बोलून चालणार नाही तर त्या व्यवस्थेचा भाग होऊन  स्वतः हुन त्या बदलामध्ये सहभागी होणं क्रमप्राप्त आहे

याची जाणीव विद्यार्थ्यांना संविधानावर घेतलेल्या खेळ, नाटीका, चर्चा यांतून होते आणि संविधानिक मूल्य आणि त्यांचे अर्थ अंगी रुजविण्याची सुरवातही येथूनच होते.

आजच्या विद्यार्थ्यांना ही माझेच एकच सांगणे आहे जेव्हा केव्हा तुम्हाला आयुष्यात एखादा प्रश्न पडेल मग तो कोणत्याही  विषयावरचा का असेना तेव्हा संविधान किंवा उद्देशिकेमध्ये दिलेल्या मुद्द्यांना अनुसरून आपली सद्सद्विवेक बुद्धी वापरून निर्णय घ्या.

कोणी काही बोललं तर मृगजळाप्रमाणे त्याच्या मागे नुसतं धावण्यापेक्षा तुमच्या मनाचा विचार यातील मूल्यांशी तासून बघा तुम्हांला आपण हून तुमचा मार्ग सापडेल..

आमचा मैत्रीसंवाद गट असाच शाळेतल्या मुलांबरोबर काम करतो आणि संविधान समजण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष निवडणूक कशी घडते याचा खेळ घेतो.

आणि हा खेळ घेतल्या नंतर त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया बरचं काही सांगून जातात.

इतकचं सांगेन की या खेळानंतर स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समानता, राष्ट्रीय एकता व एकात्मता अशा शब्दांची व्याख्या समजावण्याची वेगळी गरज पडत नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel