मंजुषा सोनारसाहित्य:
•    किसलेले बीट 3/4 वाटी
•    गव्हाचे पीठ 2 वाटी
•    चवीनुसार मीठ, तिखट, हळद, धणे जिऱ्याची पूड आणि ओवा

कृती:
•    प्रथम किसलेले बीट एका बाऊल मध्ये घेऊन त्यात दोन वाट्या कणीक टाका.
•    वरील सर्व जिन्नस एकत्र करुन कणकेत टाकावे आणि पाणी टाकून भिजवावे. नेहमी कणीक भिजवतो तसे.
•    नंतर त्रिकोणी किंवा चौकोनी आकारात लाटून तव्यावर तेलाने शेकावे.
•    तयार झालेला पराठा अतिशय पौष्टिक असतो.
•    एरवी नुसते बीट खाल्ले असता ते थोडे उग्र लागते.
•    पण पराठा करून खाल्ले तर ते सहज खाल्ले जाते.
•    लाल रंग असल्याने मुलांनाही ते आवडते.
•    शक्यतो हा पराठा पुदिना चटणी सोबत द्यावा किंवा सॉस सोबत सुद्धा खाऊ शकतो. त्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
•    जे जास्त तिखट खाऊ शकतात त्यांनी या पराठ्यासोबत कच्ची मिरची मीठ लावून खावी. छान लागते

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel