अरुण वि.देशपांडे - पुणे.
मधली सुट्टी झाली ,पोरांचे ग्रुप जमले
आपापले मग डब्बे उघडले ,
घाईत खाणे संपविले , हीच कमाल
डब्बा खातांना एकच काळजी
राहिलाय अभ्यास खूप सारा
कशाचा खेळ नि कशाची धमाल ?
ऐकुनी मुलांचे स्वर रडवेले
सर मुलांना म्हणाले
माझे ऐकाल तर कराल धमाल
पोरं जमली सरांभोवती ,म्हणती
सांगा सर सांगा हो लवकर
ताण हलका करण्याची नामी युक्ती ..
सर म्हणाले अभ्यास परीक्षा -बागुलबुवा
याला इतके भिऊ नका बुवा ?
यातून अगोदर मुक्त व्हा ..
अभ्यासाच्या वेळी अभ्यास
खेळायच्या वेळी फक्त धमाल
व्हा तणावमुक्त ,मग बघा कमाल ...!
शिक्षा नका समजू शाळा अभ्यास
ज्ञान मिळविणे हाच असू द्या ध्यास
निष्ठेने करा प्रयत्न ,यश मिळेल धमाल ...!
नको काळजी ,नको चिंता कशाची
आनंदाने रोज खा ,नका राहू उपाशी
करा मधल्या सुट्टीत रोज धमाल ...!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.