Bookstruck

बडबडगीत : खोपा.....!

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

भरत उपासनी

एक आहे झाड
झाडावरती खोपा
खोप्यामध्ये चिमणी
चिमणीची ती चोच
चोचीमध्ये दाणा
अरे पिल्ला खा ना
पिल्लाने खाल्ला दाणा
मग प्याला पाणी
नंतर म्हटली गाणी
गाणी म्हटली गोड रे
खोप्या खोप्या डोल रे
एक खोपा डोलला
पिल्लाशी तो बोलला
डोल डोल डोल रे
माझ्याशी तू बोल रे

« PreviousChapter ListNext »