भरत उपासनी
गावाकडचे अजून मजला
हरीण एक आठवते !
किती वेगाने,किती वेगाने
ते दूर दूर पळते ! //१//
गावाकडचे हरीण होते
छान एक धाकटे !
सोनेरी त्याच्या अंगावर
छोटे छोटे ठिपके ! //२//
खुंटीला बांधून ठेवले
गळ्यात त्याच्या दोरी !
सोडून देता दोरी
मारी अवखळ छान भरारी ! //३//
काळे काळे होते त्याचे
टपोर काळे डोळे !
अधांतरी जणू उडे आकाशी
चौखूर ते उधळे! //४//
अजून जेव्हा कुठे कधी मी
हरीण एक पाहतो !
मला वाटते गावाकडचे
हरीण तेच पाहतो ! //५//
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.