नमस्कार माझ्या प्रिय वाचकांनो, मी हनुमंत, मी आज तुमचा जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करत आहे...............
माझा एक मित्र आहे "सोनु". सुमारे २ वर्षांपुर्वी त्याच्यासोबत हि घटना घडलेली आहे. मित्रांनो, खरतर रात्री तळलेले पदार्थ खाऊन शहराच्या बाहेर गेल्यावर काय अनुभव येतो त्याबद्दल हे एक उत्तम दाखला आहे.........
सोनु आणि त्याचा एक मित्र दुसर्या गावी गेले होते. त्या रात्री परत आपल्या घरी येण्यासाठी निघण्याअगोदर त्यांनी तळलेले समोसे खाल्ले होते. त्या गावी सोनु चे मामा राहत होते. खुप दिवसांपासून ते एकमेकांना भेटले नव्हते आणि सोनुलाही त्याना भेटायचे होते म्हणून ते त्या गावी गेले होते. ते गाव लातुर पासून सुमारे ३० किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे ते दोघेही तिथे बाईकवरुन गेले होते. तिथे गेल्यावर त्यांनी सोनुच्या मामासोबत गप्पागोष्टी केल्या आणि रात्रीचे जेवणही उरकून घेतले.
त्या रात्री सोनुला तिथेच रहायचे होते पण, त्याच्या घरावर एक छोटेसे संकट आल्यामुळे त्या रात्री ११ वाजता त्यांना परत निघावे लागले. निघण्याअगोदर त्यांनी पुरी भाजी आणी समोसे खाल्ले होती. त्याच्या मित्राने त्याला सांगितले की, आपण इथेच राहुयात. सकाळ झाल्यावर आपण घराकडे निघुयात. पण सोनुच्या हट्टी स्वभावामुळे ते दोघे रात्रीच निघाले. ज्या रस्त्यावरुन ते निघाले होते तो रस्ता अतिशय खराब होता. त्यामुळे सोनु बाईक हळुवार चालवत होता. तिथून निघाल्यावर १८ किलोमीटर अंतरावर त्यांना एक पुल लागला. त्या पुलावर त्यांची बाईक येताच अचानक बंद पडली. त्यांनी बाईक स्टॅंडवर लावली आणि नेमके बाईकला काय झाले ते बघण्यासाठी खाली उतरले. ते आजुबाजुला काही मदत मिळते का हे पाहतच होते, इतक्यात त्यांना त्या पुलाखाली एक बाई झोका घेताना दिसली. त्यांना तो काय प्रकार आहे ते काही कळले नाही. ते परत आपल्या बाईकजवळ आले आणि बाईक सुरु करण्याचा प्रयत्न करु लागले. ते प्रयत्न करतच होते की, इतक्यात अचानक ती बाई त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली आणि त्यांच्याशी वेगळ्या भाषेत बोलू लागली. त्यांनी तिच्याकडे पाहिले तर त्यांना धक्काच बसला. त्या बाईच्या एका हाताचा सापळा बनला होता, तिच्या डोक्याची कवटी दिसत होती आणि तिचे डोळे पांढरे झाले होते. तिच्या डोळ्यातून रक्त येत होते आणि त्या बाईचे पाय उलटे होते. ते पाहून तर त्यांचे अवसानच गळून पडले. त्यांनी लगेच तिथून पळ काढला.
त्यांना पळताना बघताच ती बाईही त्यांच्या मागे पळू लागली. ते दोघेही जिवाच्या आकांताने पळत होते. पळता-पळता त्यांना एका शेतात एक छोटस मोडकळीस आलेली झोपडी दिसली, ते दोघे मदतीसाठी त्या झोपडीकडे धावली ते दोघे जोरजोराने दरवाजा ठोठावत होती शेवटी एका म्हतार्या आजीने दरवाजा उघडला आणी त्यांना आत घेतल् तेव्हा त्यांनी घडलेली घटना त्या आजीबाईला सांगीतल. मग त्या आजीबाईने त्यांना देवाचा अंगारा लावला आणी झोपु घातल. सकाळी जेव्हा ते दोघे परत त्या मार्गाने घरी जायला निघाले तेव्हा त्यांनी पाहील की त्या पुलाखाली गर्दी जमलेली होती. ती गर्दी कशामुळे जमलीये हे पाहण्यासाठी ते दोघे जेव्हा त्या पुलाखाली गेले तेव्हा त्याना समोरील दृश्य पाहुन आश्चर्याचा धक्काच बसला. की ही तीच स्ञी होती जी काल राञी पुलाखाली झोका खेळत होती..........