आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती सोनाली नावाच्या मुलीची काल्पनीक कथाआहे...आशा करतो तुम्हाला ती आवडेल, सोनाली आपल्या आई वडिलांची एकूलती एकमुलगी. आडगावला राहणारी. तिच्यावडिलांचे गावात एक मोठे किराणा मालाचेदुकान होतं.त्यावेळी सोनाली १५वीत होती.दिसायला सुंदर , जरा स्वभावानेहट्टी,लाडात वाढलेली , नेहमी काहीतरीगम्मती जमती करणारी एक मुलगी. स्वाती,पुजा, नेहा, अजय , रोहीत, संजय आणि विशाल हे तिचे वर्गमित्र .. नेहमी सगळे टोळक्यानेराहणारे...नुकत्याच दिवाळी निमित्ताने कॉलेजला १०दिवसाच्या सुट्ट्या लागल्या होत्या.. सर्वमित्र सोनालीच्या घरी आले. छान गप्पा चालूहोत्या. गप्पां करता करता विशाल तिलाम्हणाला " आम्ही सर्वांनी दिवाळीच्यासुट्टीत वडगाव म्हणून एक गाव आहे, ईथून २०किलोमीटर दूर, तिथे एक छोटी ट्रीप म्हणून जायचे ठरले आहे,, तु पण ये आमच्या सोबत...सोनाली " ठिक आहे. मी आई बाबांनाविचारते.. पण किती दिवसाची ट्रिप आहे "विशाल " अगं, फक्त तीन दिवसाची, तिथेसाहेब राव पाटील यांचा मोठा वाडा आहे,त्यांचा एकुलता एक मुलगा श्यामराव माझ्याओळखीचे आहेत. मी बोललो आहे त्यांच्याशी,त्यांनी लगेच होकार दिला. साहेबराव पाटीलएक चागले नावाजलेले नाव आहे . गावचीत्यांची १०० एकर शेती, मोठा वाडा , गाडी ,हाताखाली माणसं कामाला.. एकंदर चांगलारूबाब आहे. ते आता या जगात नाहीत. त्यांचामुलगा श्याम त्यांचा कारभार पाहतो.
"ए सोनाली चल ना!!! प्लीज चल ना!! सगळे जणतीला विनंती करत होते.कशी बशी सोनाली आईकडून ती परवानगीकाढते. सगल बिर्हाड खुष... एवढ्यात तिला एकमस्करी सुचते " अगं, पूजा तुझ्या पाठीवर झुकल बसलयं! "" कुठयं ? कुठयं ? " पुजा दचकुन अंग झाडायला लागली.सगले जण हसायला लागले." सोनाली , बावळट , अशी मस्करी करतातका ? किती घाबरली मी !!!"" सॉरी यार, गम्मत केली मी.."" एक दिवस तुला खुप महागात पडेल हे "" अगं ! सॉरी म्हणतेय ना. "" बरं, आपण जायचं कसं ? बसं ने का ? "विशाल " नाही गं ! माझी टाटासुमो आहे ना,त्यात जाऊ न सोबत, ड्रायवरला पण घेऊ सोबत !"सर्व मित्र फराल करून जातात...
रात्री सोनालीचे वडील घरी येतात,सोनाली तिच्या बाबांना ट्रीप बद्दल विचारते. बाबा ही नाही नाही म्हणतं एकदाची परवानगी देतात...जाण्याचा दिवस ठरतो. सगळे विशाल च्यागाडीत बसून सोनालीकडे येतात.आईचा निरोप घेऊन सोनालीही गाडीत बसते.गाडी वडगावकडे रवाना होते. रस्त्यानेजाताना सर्वजण अंताक्षरी खेळत, मस्ती,मजाक करत वडगावला पोहोचतात. गाडीपाटलांच्या वाड्यावर येऊन थाबते. सर्वांच्यास्वागताला शामराव उभेचं असतात.सर्व जण वाड्यात येतात.. वाडापाहून मुली "वॉव, काय सुरेख वाडा आहे, खुप छान सजावटकेली तुम्ही शामभाऊ....शामभाऊ " धन्यवाद, तुम्हाला जे काय लागेल तेसुरेश काकांना सांगा , चला मी जातो आता,एक काम आहे ते करून येतो, रात्री बसून मस्तगप्पा मारू... चला "सूरेश काका गडीमाणूस, नेहमी त्याच्या सोबतहोता. जेवण करून सगले जण शामभाऊच्या शेतावरगेले.शेत मस्त फिरून वाड्यावर येतात.वाडा बघताबघता सगळे साहेबरावांच्या मोठ्यातसबीरीकडे जातात.साहेबरावांच्या मोठ्या मिशा , टपोरे डोले,आणि त्यांची ती भेदक दृष्टीने युक्तकुणाच्याही मनात धडकी भरेल अशी तसबीर तीहोती.
सोनालीला ती तसबीर बघून मस्करी सुचते, तीम्हणते, " हे साहेबराव ना माझे सासरे आहेत "आणि हसायला लागते." सोनाली व्हॉट रब्बीश , पुन्हा तु सूरू झालीका ? "" सोनाली , अगं खरचं हे माझे सासरे आहेत आणिमी त्यांची सून आहे "सोनाली ओक फुलांचा हार त्या फोटोवर चढवते व त्यांना नैवेद्य दाखवते. हा प्रकार तीत ीन दिवस रोज करते.३ दिवसाने सर्व जण आपलेया घरी जाताच. पण सोनालीला माहीत नव्हतं की हा प्रकारतिच्या अंगावर येणार आहे.घरी पोहोचल्यावर रात्री ती एक हॉरर मुव्हीपाहून आपल्या रूम मध्ये झोपून गेली.साहेबराव तिच्या स्वप्नात येतात आणिम्हणतात " सुनबाई ओ सुनबाई , चल ना घरी, शाम तुला बोलवत आहे. माझी लाडकी सुन आहे तू,किती सेवा केली तू माझी ." एवढं ऐकून सोनाली खडूबडून जागी झाली. स्वत:शीच विचार करत बसली, बाप रे, किती भयानक स्वप्न होतं हे , कोण होता तो म्हातारा ,जाऊ दे, पुन्हा झोपते मी. "थोड्या वेळाने साहेबराव पुन्हा स्वप्नात आले,"सूनबाई ओ सूनबाई, चला ना घरी, मी तुझासासरा आहे विसरली का तू मला. ऐकत नाहीका तू माझं ? चलं " साहेबराव या वेळी जरारागातच होते.
आता मात्र सोनाली चांगलीचघाबरली. तिला कळून चूकलं की आपली गम्मतआपल्यावरचं भारी पडत आहे.दुसर्यादिवशी सोनाली झोपेत होती,अचानक तीला कसलीतरी जाणीव झालीआणि तिने पाहील तर तिच्या अंगावरून ब्लंकेटआपोआप खाली सरकत आहे. सोनालीने घाबरूनपुन्हा ब्लंकेट वर केलं. तिला असं जाणवलं कीकोणतरी तिच्या आसपास कोणी आहे. तीघाबरून डोळे उघडते तर साहेबराव तिच्या समोरहोते. सोनाली हे पाहून चळाचळा कापायलालागते... " काय पाहिजे तुम्हाला ? "" चल सूनबाई , मी तुला न्यायला आलोय, चलमाझ्यासोबत "" जा तुम्ही इथून प्लीज "" नाही सूनबाई, तूला घेतल्याशिवाय मी जाणार नाही . चल लवकर घरी तु ! शाम तुझीवाट पाहत आहे . "एवढ बोलून साहेबराव तिच्या जवळ यायला लागले, सोनाली जोरात किंचाळली, तीचाआवाज ऐकून आई वडील धावत तिच्या रूम वरआले. सोनाली रडत होती.आई " काय गं ए सोनाली काय झालं ,?""काहीनाही आई भयानक स्वप्न पडलं "बाबा " किती वेळा सांगितलं की हॉररपिच्चर बघत जाऊ नको म्हणून "आई " जाऊ द्या हो, ही काय वेळ आहे काओरडायची , तीची हालत बघा जरा.
सोनाली, झोप बेटा तूं"एवढं बोलून ते दोघे निघून गेले. पण सोनाली लाकाही झोप नाही लागली, जराश्याआवाजाने ता दचकून जागायची, ती रात्रहीजागूनच काढली.दुसर्या दिवशी दुपारची वेळ होती.सोनालीला तिची आई तिला म्हणाली "सोनाली मी शेजारच्या काकूकडे जाऊन येते ,कुठे जाऊ नकोस"" लवकर ये " खरतर तिला खुप भिती वाटतहोती, पण कारण सांगू शकत नव्हती...आई गेल्यावर सोनाली एकटीच घरात बसलीहोती.. ईतक्यात साहेबरावांचा आवाज पुर्णघरात घुमू लागला... " सूनबाई , ओ सू न बा ई "सोनाली खुप घाबरली, साहेबरावांची आकृतीअचानक प्रकट झाली. ... सोनालीचीचांगलीच चळाचळा कापू लागली, त्यांनापाहून मागे मागे रूम च्या एका कोपर्यात जाऊलागली.." सुनबाई, चल ना घरी, किती सेवा केली तूमाझी, मी तुझ्यावर खुप खूष आहे. तूला कसं माहीत मला भेंडीची भाजी आवडते ? छानहां ! ! ! पाटलाची सून शोभतेस तू . चल सून बाई श्याम वाट पाहत आहे तूझी ."" प्लीज मी तुमची सून बाई नाहीये, मी तर थोडी गंमत केली, मला काय माहीत तुम्ही खुष व्हाल. प्लीज जा ईथून " सोनाली जीवाचाआकांत करून रडत होती.
साहेबराव " काय बोलतेस तू सूनबाई, अगं मी तूझा सासरा आहे, मी बर्याच दिवसापासून उपाशी होतो ! तू मला जेऊ घातलेस. मलाकोणती भाजी आवडते तूला तर सार माहीत आहे. चल ना घरी तूझ्याविना माझं घर सूनं आहे."एवढं बोलून ते सोनालीचा हात धरायला पुढे पूढे यायला लागले."प्लीज, माझ्या जवळ येऊ नका, प्लीज. "सोनाली मोठ्याने ओरडली, डोळे बंद करूनजागच्या जागी बसली. एवढ्यात तिला स्पर्शजाणवला , ती ने वर बघीतलं तर आई होती.आईला बघून ती आईच्या कूषीत धावली. तीचा हा अवतार व ओरडणं बघून आईला धक्काचं बसतो." काय गं , एवढ्या मोठ्याने ओरडायला काय झालं ?"सोनाली तीला सर्व खर खर सांगते..रात्री आई सोनालीच्या वडिलांना सगळं समजवून सांगते. सोनालीचे बाबा तिच्या सर्वमित्रांना घरी बोलवतात.. पूजा सांगते " अहोकाका ही त्या साहेबरावांच्या तसबीरीला सासरा सासरा म्हणून बोलत होती, त्या तसबीरीला हार , रोज ताट वगैरे दाखवत होती.. त्या साहेबरावांचा आत्माचं हिलात्रास देत असणार ."सोनाली हे ऐकून खुप रडते. तीचे बाबा एकाप्रसिद्ध महाराजांकडे तिला घेऊन जातात . तेमहाराज सोनालीवर फार चिडतात , " एपोरी अक्कल आहे की विकली बापाच्यादुकानात, जास्त शहाणी झालीस काय ?मेलेल्या माणसाची मस्करी करू नये हे माहीतनव्हतं का ? काय तरं म्हणे मी सूनबाई, ,,, बरं,,,झालं ते झांल , आता काय सांगतो ते नाट ऐका , त्या साहेबरावाच्या वाड्यावर जाऊन एक पूजा घाला, त्याच्या मूलाला त्यांची शांती करायला सांगा , तेव्हाचं तो साहेबरावांचा आत्मा मुक्त होईल ."सगळे परत वाड्यावर जातात, झालेला प्रकार श्यामराव ला सांगतात ,. हे ऐकून श्यामराव दु:खी होतात . सोनाली त्यांची माफी मागते.श्यामराव सांगतात " माझं लग्न नाही झालं,माझ्या लग्नाची बोलणी करायला माझेवडील जात असताना त्यांचा जबर अपघातझाला. त्यातच ते गेले. माझं लग्न झालेलं पाहणंही त्यांची शेवटची एकचं ईच्छा होती. सोनालीने जो प्रकार केला त्यामुले ते तिच्यामागे लागले असतील. " श्यामराव त्यांना पूजा करण्याची अनूमती देतात व नंतर स्वत: पितरशांती करतात. ह्यानंतर साहेबराव कधीच सोनालीला त्रास देत नाहीत. पण सोनालीआता मेलेल्या काय जिवंत माणसाचीही मस्करी करत नाही.