अस काय दिसतेय काळ्या सावली सारखे कोणीतरी लहानमुल अंगाचे मुटकुळं करून बसल्यासारखे? म्हणून त्या पटकन आत येऊन टेबला खाली वाकल्या...झपक्यात कुणीतरी टेबलाखालुन सेटी खाली गेल्याचे दोघींनाही स्पष्ट दिसले...अंधारात चमकले फक्त पिवळसर डोळे...!टकटकित त्यांच्या कडेच पहात असलेले....!
दोघी जरा घाबरून मागे सरकल्या....मांजर असेल किंवा माकड तरी...! त्या सेटी खाली वाकणार ईतक्यात सतिशराव जागे झाले.
"अहो सेटी खाली मांजर कि माकड कोणीतरी नक्कीच शिरलेय..."असे म्हणत त्या सेटीखाली वाकणार ईतक्यात सतिशरावांनी त्यांना हाताला धरून गपकन ऊठवले...."मी पहातो ,तुम्ही दोघी बाहेर व्हा! "म्हणत त्यांनी दोघींना बाहेर ढकलत वर दार लावून घेतले...!
कामवाली मावशी बाहेर आल्यावर म्हणाल्या.."ताई,मला नाही वाटत...ते मांजर किंवा ऊंदिर घुस,माकड होते म्हणून....!!काहितरी निराळेच आहे हे प्रकरण...सांभाळून रहा...!
सुनिताबाई डोळे विस्फारून पहात रहिल्या..!!
"अहो काय बोलताय तुम्ही?सुनिता बाई म्हणाल्या
"ताई..खर तेच सांगते,मला ती खोली काही ठिक वाटत नाही...वेगळीच भीती वाटते तिथे...पाच मीनिट जरी थांबले तरी वाटते कोणीतरी लक्ष ठेऊन आहे आपल्यावर...गारठा पण जाणवतो...!अस वाटते जीथ तिथ कोणीतरी बसलेले असते...असे मनात येत की ते बसलेलं असत तिथंल काम साहेब करू देत नाही...मग ते कपाटाच्या कोपऱ्यात असुदे नाहीतर टेबल किंवा सेटि खाली असुदेत...मला फार भीती वाटते त्या खोलीची" मावशी म्हणाली.
" तुमचे काहितरीच असते"
अहो त्यांच्या कामाचे काही कागदपत्र पडलेली असतात एखादा महत्वाचा पेपर केरात गेला तर?
आणि मला ते मांजरासारखेच वाटतय...त्याला ते हकलतिल ..ऊगाच घाबरू नका...
चला कामाला लागा!म्हणत सुनिताबाईनी विषय बदलला
त्या नंतर...
सकाळ पासुन सतिशराव जे आत होते ते बाहेर पडलेच नाहीत...!
संध्याकाळी एकदा दारात आले पण परत आत जाऊन दार लावले...
रात्र झाली...!!
सुनिता बाई बाहेर हाॅल मध्येच आडव्या झाल्या पण खरच जरा डोळा लागला,मधेच जरा जाग आली..मग ऊगाचच हळु आवाजात टीव्हीचे चायनल बदलत बसल्या....!
सहज म्हणून लेखणीच्या खोलीकडे नजर टाकली...!!
नी चमकल्याच...दाराबाहेर पिवळा प्रकाश फेकला जात होता...!!
मध्येच माकडाच्या आकारा ईतकी सावली दिसत होती...मध्येच कधीकधी मोठ्ठी माणसाची सावली येरझारे मारताना दिसत होती...
काहीतरी हातवारे करून बोलत असल्याच्या सावल्या दिसत होत्या.
टीव्ही बंद करून त्या दारापाशी आल्या...दाराला कान लावून ऊभ्या राहिल्या...आत मध्ये कोणीतरी बोलत असल्यासारखे आवाज येत होते...एक आवाज तर स्वत: सतिशरावांचाच होता पण दुसरा लांबून येणारा खसखस करणारा आवाज होता...
"मी तुला असे करू देणार नाही....तिचा वापर मी ह्यासाठी होऊ देणार नाही...
तु घरात रहायला जागा मागितलीस मी दिली नव्हती धोक्याने तु हो वदवून घेतलेस..तु म्हणालास फक्त ह्या खोलीत जागा दे.पण ..आता तुझी ही मागणी मला मान्य नाही..!!!
खसखसता आवाज येऊ लागला...मला जे साध्य करायचेय ते मी करणारच..खसखसखस.. तुच मला हो ये म्हणालायस..खसखसखस...मी फक्त रहायला आलो नाही आहे...खसखसखस..!माझे ईथे रहाण्या मागचे कारण तुला सांगुन झाले आहे...मी तुझे ऐकायला ईथ आलो नाहीए....तुच मला ईथ आकर्शित केलेय...आता? खुखुखु.....
हुईईईईई...आॅक करून आवाज आला...खसखसखस...खीखी खी...
अचानक पिवळा ऊजेड विझला..अन खोलीत शांतता पसरली...
सुनिताबाईनी हळूच दार वाजवले..."कुणाशी बोलताय...दार ऊघडा मला आत येऊद्या...
आतुन आवाज येतो" खसखसखस...अग नवीन लेख लिहीतोय तु नीज काहिनाही....खसखसखस....!!!
सकाळी जरा उशिराच सुनिताबाईना जाग येते.
त्यांना दिसते, सकाळी
सकाळी स्वत: सतिशराव बाहेर चहा घेऊन येत असतात...!
अगदी हसत ते सुनिताबाई ना गुड माॅर्नीग म्हणत चहाचा कप त्यांच्या हातात देतात...चल आवर आज बाहेर चक्कर मारून येऊ म्हणतात...!
"माझा आजचाच दिवस काय तर पुढिल आठ दिवस फक्त तुझेच..!
मी जरा लेखनाला सुट्टी द्यायचे ठरवलेय...
हया पुढे जमेल तसा माझा वेळ मी तुला देणारच आहे...!
पण हे आठ दिवस तर नक्कीच असे देईन....कि तु कायम आठवणित ठेवशिल...!
सुनिताबाई त्यांच्याकडे पहातच रहातात...मनात विचार करतात..
मग काल जे पाहिले ऐकले ते माझे स्वप्न तर नव्हते...?कि झोपेत झालेला भास...
कालचा विचार झटकुन त्या पटापटा आवरायला लागतात...आज त्या फार आनंदात असतात...!
आवरून झाल्यावर...सतिशराव लेखणीच्या खोलीला बाहेरून कुलुप घालतात...!
दोघे बाहेर पडतात..!
जुने दिवस परत आले असे म्हणत..सुनिताबाई मोहरून जातात....!
रात्री घरी परतल्यावर सतिशराव सुनिताबाईच्या बेडरूम मध्येच निजतात....
रात्र तरूण होत जाते....!
बरेच दिवस सतत सतिशराव सुनिताबाईंसोबत मजेत दिवस घालवतात...!अन् रात्र सुध्दा....!!
पुन्हा सगळे सुरळीत चालू होते....
आठ दिवस मजेत जातात..
फक्त त्या लेखनाच्या खोलीतला कुबट वास व गारठा सोडला तर....सगळे मस्त सुरू असते.
एके दिवशी....
सकाळी जाग आल्यावर सुनिताबाई पहातात सतिशराव दिसत नसतात...त्या लेखनाच्या खोली जवळ येतात पण दाराला कुलुप पाहुन मागे फीरतात..ईथेच कुठे बाहेर गेले असतील म्हणून त्या आवराआवरी करायला घेतात..
दार वाजते...बहुतेक सतिशराव आले म्हणून दार ऊघडतात...दारात मावशी असतात...
मावशीशी गप्पा मारत कामे सुरू असतात....
"ताई...खोलीची चावी द्या सफाई करायचीय...मावशी म्हणतात.
हिच वेळ खोली तपासायची म्हणून त्यांचे डोळे चमकतात.
पटकन मुख्यदार लाऊन त्या चावी शोधतात...पण चावी सापडत नाही
मावशीला सोबत घेऊन कुलुप तोडतात...