आज मी माझा अनुभव शेअर करतो आहे तुम्हा सर्वांन सोबत,या मध्ये माझा अनुभव एकच आहे आणि अनुभव घेण्या साठी मी जिथे जिथे गेलो आहे त्या ठिकाणची माहिती देणार आहे,तसेच गावात मी जे काही ऐकले आहे त्यांचे अनुभव याचे लिखाण करणार आहे. काही चुकले असेल लिहिताना तर आधीच मी क्षमा मागतो....हो एक राहिलेच ज्यांचा भुताखेतांवर विश्वास नाही त्यांनी या पोस्ट ला लाइक, कंमेंट्स नाही केलेत तरी चालेल थोडक्यात या पोस्ट पासून अश्यानी दूरच रहावे ही नम्र विनंती.....

१ ) माझा जन्म मुंबई मध्ये जरी झाला असला तरी मला मुंबई पेक्षा माझे गाव खूप आवडते आणि मी खरच धन्य आहे की मी कोकणातला आहे.माझ्या गावाचे नाव निवतीमेढा, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. मस्त असे हे गाव समुद्र किनाऱ्यावर जन्माला आलेले आहे.गावाचे वर्णन करत बसलो तर मी ऐकलेला अनुभव बाजूलाच रहायचा.
मी जे अनुभव सांगणार आहेत ते 2 आहेत जे माझ्या चुलत भावला आले तो गावातच असतो,गावातच त्याचे शिक्षण पूर्ण झाले, शेती मध्ये माहीर रात्री मासेमारी करणे हे त्याचे उद्योग.मी सातवीत असताना घरच्यान बरोबर गावाला आलेलो मे च्या सुट्टीत. गावाला येऊन 10 ते 12 दिवस झाले असतील आम्ही सर्व भावंड एकत्र जेऊन लोट्यावर गप्पा मारत बसलो होतो आणि विषय होता आपल्या सर्वांचा आवडता भुतांचा, आता असले विषय गावामध्ये ते पण 10 च्या दरम्यान म्हणजे खूप मोठी गोष्ट कारण गाव म्हटले की 9 वाजताच सगळे झोपायच्या तयारीत असो तर तेव्हा मी लहान उद्यगी कार्ट घरात गावच्या कळी घरी आणणारा आणि तेव्हा त्या सर्व भावंडांचा मुख्य हेतू होता मला घाबरवायचा जेणे करून मी शांत राहीन. तर मंडळी माझ्या भावाने सांगायला सुरुवात केली , माझ्या भावाला दशावतारी नाटक बघण्याचा जाम शौक आहे गावात कुठे ही नाटक असले तर तो आवरजूंन ते बघायला जायचा रात्री अपरात्री . एकदा असाच तो दुसऱ्या गावातून आमच्या निवतीच्या गावी येत होता दुसरे गाव म्हणजे आमच्या गावापासून 3 किलो मीटर वर असलेले श्रीराम वाडी हे गाव गावच्या खाडी वरचा पूल पार केला की श्रीराम वाडी हे गाव.हा पूल तसा जुनाच ,पुलाच्या आजूबाजूला सुरुची झाडे आणि त्या सुरुच्या झाडांमधून रात्रीचा वाहणारा वारा म्हणजे भयानक आवाज करणारा.त्यात अमावस्या रात्रीचा काळोख त्यातून तो घरी येत होता एकटाच होता जसा तो पुलावरून चालायला लागला तेव्हा त्याला त्याच्या मित्राने आवाज दिला आवाज लांबून येत होता तसा तो थांबला मागे वळून बघणार तोच याला काय झाले माहीत नाही घाम फुटला आवाज ओळखीचा होता मागे वळून न बघता तो चालत राहिला आणि तो आवाज त्याचा पाठलाग करत होता अरे अजित थांब रे मागे बघ तरी मी सुजल आवाज ओळखिचो नाय काय असो काय तू माका नाय ओळखलस आता आवाज त्याच्या कानात एका फुटाच्या अंतरावरून यायला लागला मन घट्ट करुन दादा चालतच राहिला मनात देवाचे नाव घेत होता .कसा बसा त्याने तो पूल पार केला आणि गावच्या हद्दीत आल्यावर जो पळत सुटला तो घरी येऊन थांबला आणि त्याने घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला तेव्हा घरचे बोलले बर झाले मागे नाही बघितलेस, मी हे सगळे ऐकत होतो तेवढ्यात मी बोलून टाकले बघायचे ना मागे कशाला धावत आलास तेव्हा दादा म्हणाला मी बघितले असते जर तो जिवंत असता तर, तो मित्र त्या खाडीत पोहताना डुबुन मरण पावला 10 दिवसा पूर्वी.हे ऐकून मला घाम फुटला.

2) हाच माझा दादा एकदा मासे पकडायला खाडीत गेला होता साधारण रात्रीचे 10.30 वाजले होते.तेव्हा पोर्णिमा होती आणि समुद्राला भरती पण होती त्यावेळेस . मस्त चांदणे पडले होते आणि पूर्ण चंद्राच्या प्रकाशात माझा भाऊ मासे पागत होता.रात्रीचे 1 वाजले तरी हा घरी आला नाही म्हणून घरचे चिंता करायला लागले.मग माझे काका आणि आजूबाजूचे दोघे तिघे मिळून भावाला शोधायला निघाले.रात्रीचे आता 2 वाजले होते रोजच्या ठकाणी मासे पगायचा तिकडे नव्हता म्हणून काकांना शंका आली की हा नको असलेल्या जागी जाऊन मासे पागत असणार लगेच सगळे त्या जागी आले तर हा अजित तिकडेच मासे पागत होता.काकांनी त्याला हाक मारली रे अजित काय ह्या पाण्यातसून बाहेर ये आधी अजित काय ऐकत नव्हता तसाच हातात जाळे घेऊन उभा होता .त्याची एकच हाल चाल होती जाळे टाकत होता जाळे ओढत होता आणि टोपलीत ते ओढलेले जाळे खाली करत होता आणि पुन्हा तेच करत होता काका त्याला हाक मारत होते त्याच्या कडे लक्षच नव्हते.शेवटी काका आणि ते बाकीचे पाण्यात उतरले तरी अजित समोरच बघत होता आणि जाळे ओढत होता.काकांनी विचारले पुन्हा रे अजित काय करतस हयता. तेव्हा दादा बोलला खूप मासे गावले आसात टोपली भरान गेली दुसरी टोपली हाडून दिया आधी.काकांना कळले ह्याला कोणी तरी झपाटले होते कारण टोपलीत एक ही मासा नव्हता.काकांनी त्याच्या एक कानाखाली मारली तेव्हा तो शुद्धीवर आला आणि चक्कर येऊन खाली पडला .सर्वांनी त्याला घरी आणले त्याच्यावरून नारळ उतरवून काढला.तेव्हा दादा 2 दिवस तापामध्ये होता.हे ऐकून मी अजूनच थंड पडलो आणि मनात विचार केला की त्या पुलावर आणि खाडीवर कधी जायचे नाही.तेव्हा लहान होतो मी घाबरलो होतो शेवटी सातवीतले वय.
मी भूत बघितले नाही पण तेव्हा पासून मनात इच्छा जागृत झाली की भूत बघून रहायचे पण आता पर्यन्त ऐकतच आलो की भूत असते पण माझा आणि त्याचा सामना कधी झाला नाही आता पर्यंत तरी हो मी एक अनुभव घेतला तो पुढ्याच्या लिखाणात शेअर करेन..

( क्रमशः)
रुद्र कुलकर्णी

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel