उन्हाळ्याची सुट्टी लागली की आंम्ही..आजोळी कोकणात
जात असू...प्रशस्त दुमजली घर,अंगणातच आंबे,फणस,
काजू ,नारळी,पोफळीच्या झाडांनी गर्दी केली होती.
विषेशतः... अंगणातच एक झोपाळा होता.खूप मोठा होता....लाकडी,पितळी कड्यांचा...आंम्ही दिवसभर
तिथेच खेळत असू.जवळच निळाशार पसरलेला समुद्र
समुद्राची गाज.....त्यावरून येणारे वारे...चांदी विखरुन
टाकावी अशी रेती,मधूनच समुद्र पक्षी...आकाशात भिरभिरे,...तर कधी बगळ्यांची माळ अंबरात रुळत असे.
खरच!!!!-----मला कोकण जाम आवडते,
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.