श्रीपादश्रीवल्लभ नरहरी तारि तारि मजला । दयाळा तारि तारि मजला । श्रमलों मी या प्रपंचधामीं आलों शरण तुला ॥धृ.॥
करितां आटाआटीं प्रपंच अवघा दिसतो मिथ्यत्व दयाळा दिसतो मिथ्यत्व । म्हणवुनी भजन तुझे मज वाटे तारक सत्यत्त्व ॥१॥
किंचिन्मात्र कृपा जरी मजवरी करिशिल उदार मन । चुकलों मी या विषयसुखाचे आहारांतून जाण ॥२॥
कृष्णातटनिकटीं जो विलसे औदुंबरछायीं । हंस परात्पर भारतिनायक लीन तुझें पायीं ॥३॥
श्रीपादश्रीवल्लभ नरहरी तारि तारि मजला । दयाळा तारि तारि मजला । श्रमलों मी या प्रपंचधामीं आलों शरण तुला ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel