आतां स्वामी सुखें निद्रा करा अवधूता । करा अवधूता । चिन्मय सुखधाम जाऊनि पहुडा एकांता ॥धृ.॥
वैराग्याचा कुंचा घेऊनि चौक झाडीला । स्वामी चौक झाडीला । तयावरी सुप्रेमाचा शिडकावा दिधला । पायघडया घातल्या सुंदरा नवविधा भक्ति । सुंदरा नवविधा भक्ति । ज्ञानाच्या समया लावुनी लावियला ज्योति ॥१॥
आतां भावार्थाया मंडप ह्रदयाकाशीं टांगीला । स्वामी ह्रदयाकाशीं टांगीला । मनाच्या सुमनें करूनी केलें शेजेला । द्वैताचें कपाट लावूनी एकत्र केलें । गुरु हें एकत्र केलें । दुर्बुद्धीच्या गांठी सोडुनी पडदे सोडिले ॥आतां.॥२॥
आतां तृष्णा कल्पनेचा सांडुनी गलबला । सांडुनि गलबला । दया क्षमा शांति दासी दासी उभया शेजेला । अक्षय्य उन्मन देऊनि नाजुक तो शेला । देऊनि नाजुक तो शेला । निरंजन सद्‌गुरु स्वामीं निजे शेजेला ॥आतां.॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel