नृसिंह सरस्वती-मनीं धरूनीया प्रीती । ओवाळीतों शेजारती । अंगीकारावीं श्रीपती ॥धृ.॥
ब्रह्मा येउनि देव देवा । म्हणे कवण्या कवण्या जीवा । उपजवूं कोठें केव्हां । संदेश हा मज व्हावा ॥१॥
विष्णु ही येउनीया । आज्ञा मागें वंदुनिया ॥ कोण जीवा काय खाया । कैसें देउं कवण्या ठाया? ॥२॥
येउनीया महादेव । वंदोनीया पादद्वंद्व ॥ ज्ञान देऊं कवण्या जीवा । आज्ञा करा स्वयमेवा ॥३॥
अंबा म्हणे बाळा यती । फार झाली असे रात्री ॥ झोंप आली तुजप्रती । भक्त रक्षुनी श्रम होती ॥४॥
विनविताती भक्तवृंद । सेवा घेउनिया छंद ॥ पूर्ण देई ब्रह्मानंद । भीमपुत्र नंदस्कंद ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel