जयदेव जयदेव जय दत्तात्रया । आरती ओवाळूं तुझीया पायां ॥धृ॥
पंचप्राण वाती एकत्र केली । तुझिये नामस्मरणीं घृतीं भिजविली ॥
हृदयीं ध्यान ध्यातां प्रदीप्त झाली । मन हें उजळुनीयां एकारत केली ॥१॥
कल्पने वा वायू समूळ नीमाला । सोहंभावें दीप अक्षई ठेला ।
सर्वाभूती दिगंबर प्रकाशला । द्वैताचा तमरज विलयासी गेला ॥२॥
सरली वाती ज्योती एकत्र झाली ॥ भ्रांतीची काजळी समूळ नीमाली ॥
सद्गुरु प्रसादें युक्ती फावली । निरंजन धृती स्वस्वरूपीं ठेली ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel