श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि तारिं तारि मजला ॥
दयाळा तारिं तारिं मजला ॥
श्रमलों मी या प्रपंचधामी आलो शरण तुला ॥ धृ. ॥
करितां आटाआटी प्रपंच अवघा दिसतो मिथ्यत्व, अवघा दिसतो मिथ्यत्व ।
म्हणवुनि भजन तुजे मज देवा भासे सत्यत्व ॥ १ ॥
किंचिन्मात्र कृपा जरि मजवरि करिसि उदार मन, दयाळा करिसि उदार मन ।
चुकलों मी या विषयसुखाच्या आहारांतुनि जाण ॥ २ ॥
कृष्णतटिं निकटी जो विलसे औदुंबर छायी, दयाळा औदुंबर छायी ।
हंस परात्पर भारतिनायक लीन तुझे पायीं ॥ ३ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.