अनुसूयासुत, दत्तदिगंबर त्रिगुणरहित, तव चरणांते ।

पंचारति ही करुनी भावे अर्पि काय पदकमलांतें॥ धृ. ॥

शांतिरुपी सेना दाऊनियां पुनित केलें भारतितें ।

काष्ठा फुलवुनी दुग्ध दोहविसी निमिषी वंध्ये महिषीतें ॥

ऎसा तव महिमा पाहुनिया, मोहियले मज तव चरितें ।

म्हणूनी शरणागत रूक्मिणिसुत तारीं गा तव दासातें ॥ १ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel