जयजयजी दत्तराज भॊ दिगंबरा ।

पंचारति करितो तुज तारि किंकरा ॥ धृ. ॥

त्रिगुणात्मक रुप तुझें केंवि शोभलें ।

शुद्ध कांति तारिं रविशशिहि लोपलें ॥

शरणागत भाविक नर बहुत तारिले ।

संकटिं मज पाव विभो देई आसरा ॥ १ ॥

अधसंचित दोषे चौर्‌यांशी हिंडलो कवण योगासामर्थ्ये देहि पातलों ।

धांव आता दु:खें बहुपिडित जाहलों ॥

अभयवरें विठ्ठलसुत रक्षि भवहरा ॥ २ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel